जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या संकल्पनेतून आयोजित ड्रग्सविरोधी जनजागृती रील स्पर्धेत जालना शहरातील साहिल पाटील व लखन जाधव यांनी सादर केलेली रील सर्वोत्कृष्ट ठरली आहे. सोमवार दि. 15 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेत त्यांनी प्रभावी संदेश आणि समाजभान जपणारे सादरीकरण केल्याने परीक्षकांनी त्यांच्या रीलची निवड केली. सोमवार, 15 डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या हस्ते साहिल पाटील यांचा सत्कार केला.