शहरातील पंचशील नगर येथे 8 डिसेंबर 2025 रोजी पकडण्यात आलेल्या सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणात आता गंभीर व खळबळजनक वळण लागले आहे. या प्रकरणातील तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी थेट वणी पोलीस प्रशासनावर तंबाखू माफियांशी संगनमत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.