नेवासा: नेवासा तालुक्यात दुसऱ्यांदा ढगफुटीदृश्य पाऊस ; नुकसानीची केली पाहणी
नेवासा तालुक्यातील सोनई, लांडेवाडी, गणेशवाडी, शिरेगाव व चांदा घोडेगाव खरवंडी वडाळा, पानेगाव या परिसरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली, अनेक घरात पाणी शिरले, जनावरे, कांद्याच्या चाळी तसेच शाळा पाण्याच्या विळख्यात सापडल्या असून आ.विठ्ठलराव लंघे यांनी पाहणी केली आहे.