मंगळवेढा: सरकारने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत
मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. दरम्यान या भागातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यात येत नाहीत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत यांनी केली आहे. आज रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पीक नुकसानीची पाहणी अनिल सावंत यांनी केली. यावेळी ते आज रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलत होते.