देवणी: वाघनाळवाडी येथील गोविंद एडले यांची सोयाबीनची बनीम अज्ञाताने पेटवली. काँग्रेस डॉक्टर सेलचे डॉ.भातांब्रे यांचा मदतीचा हात
Deoni, Latur | Oct 19, 2025 देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी येथील शेतकरी गोविंद अंकुश येडले या शेतकर्यांनी सहा एक्कर क्षेत्रावर कष्टाने पिकवलेल सोयाबीन काढनी नंतर बनीम मारून ठेवले होती पण समाजात काही समाजकंटक लोक असतात अशाच अज्ञात व्यक्तींनी त्या सोयाबीनच्या बनीमस आग लावून दिली.ही घटना कळताच क्षणी डाॅ. अरविंद भातांब्रे यांनी सहकाऱ्यांसह व स्थानिक शेतकरी आणि गावकरी यांच्या समवेत घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली.