शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ येथील कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक ९ ते १३ जानेवारी २०२६ दरम्यान नंदुरकर क्रिकेट ग्राऊंड,मेडिकल कॅम्पसजवळ, यवतमाळ येथे संपन्न होत आहे.या स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजकांना सदिच्छा भेट देत क्रिकेट पटूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.यवतमाळ जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल व्हावे,अशी भावना शेतकरी चळवळीचे प्रा.पंढरी पाठे यांनी व्यक्त केली.