पनवेल: रॅली, जल्लोष आणि उत्साह; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत करंजाडेत महायुतीचा जोरदार प्रचार
Panvel, Raigad | Feb 3, 2026 वडघर जिल्हा परिषद गटाच्या महायुतीच्या उमेदवार सोनाली जितेकर आणि करंजाडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार रंजना वास्कर यांच्या प्रचारार्थ करंजाडे परिसरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना रामशेठ ठाकूर यांनी महायुतीच्या उमेदवारांना भरघोष मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. ही बाईक रॅली करंजाडे परिसरातील विविध भागांतून काढण्यात आली, जिथे स्थानिक ग्रामस्थ आणि मतदारांनी उमेदवारांचे जंगी स्वागत केले.