भुदरगड: गारगोटी येथे आजरा अर्बन बँकेजवळ झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार, भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद
भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे आजरा अर्बन बँकेच्या शाखेनजीक भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली असून मृत झालेल्याचे नाव बाळू रामा कुपटे (वय ६० वर्ष, रा. सोनाळी) असे आहे. या घटनेचा भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस व घटनास्थळावरून मिळालेले माहिती अशी आहे की, गारगोटी -पाटगाव रोडवर मंगळवारी ट्रक भरधाव वेगाने ट्रक कडगावकडे जात होता. यावेळी आजरा अर्बन बँक शाखेशेजारी रस्त्याच्या बाजूला हा अपघात झाला.