धुळे: मोघन गाव परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, मोहाडी नगर पोलीस ठाण्यात नोंद
Dhule, Dhule | Sep 14, 2025 धुळे तालुक्यातील मोघान गावात १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मोहाडी नगर पोलिसांत दाखल झाली आहे. १२ सप्टेंबर रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कुटुंबीयांनी शोध घेतला पण मुलगी न सापडल्याने, १३ सप्टेंबर रोजी आईने तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.