पैठण येथील जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग;बीड जिल्ह्यातील गीदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Beed, Beed | Sep 28, 2025 पैठण येथील जायकवाडी धरणातून आज रविवार दि.28 सप्टेंबर रोजी दुपारी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता धरणाचे १८ दरवाजे सात फूट अर्धा इतके उघडण्यात आले.यामुळे गोदावरी नदीपात्रात ९ हजार ४३२ क्युसेक पाणी अधिक सोडण्यात आले असून, एकूण १ लाख ७९ हजार २०८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरणात पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी बदल करण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क