सातारा: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन
Satara, Satara | Nov 27, 2025 जिल्हा परिषद सातारा द्वारे 2023 मध्ये आरोग्य सेविका या पदाकरिता घेतलेल्या, स्पर्धा परीक्षेमधील प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती करून घेण्यासाठी, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यासमोर आज, गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.