भंडारा: दिवाळी निमित्त पशुधन ओवाळणीसाठी साज-शृंगाराची दुकाने सजली, भंडारा जिल्ह्यातील बाजारपेठेत वाढली गर्दी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत पशुधन ओवाळणीची उत्साही तयारी सुरू झाली असून, बाजारपेठेत गायी-म्हशींच्या साज-शृंगारासाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली आहेत. परंपरेनुसार, शेतकरी आपल्या गोधनाचे औक्षण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. यासाठी घंटा, गळपट्टा, रंगीत दोरे, कवड्या, मणी, घंट्या, फिती, पोत, तसेच कपाळासाठी कुंकू आणि रंगीत रंगोळी यांसारखे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे.