मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत सरपंच सौ. पल्लवी विजय भरसट यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या अंतर्गत हरणगांव ग्रामपंचायतीने एक अत्यंत नावीन्यपूर्ण व प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. गावातील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्ध योजना प्रभावीपणे राबवित सरपंच सौ. पल्लवी विजय भरसट यांनी आपल्या सरपंच निधीतून पुढाकार घेत या योजनेचा पहिला हप्ता भरून एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.