✨👶🏻 नाशिक जिल्यात कुपोषण मुक्तीच्या दिशेने 'पोषणदूत योजना' प्रभावीपणे अंमलबजावणी; जिल्यातील 97 बालके 'नॉर्मल' श्रेणीत! ✨
3.9k views | Nashik, Maharashtra | Oct 28, 2025 मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद नाशिक, ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शना नुसार जिल्ह्यात कुपोषण कमी करण्याच्या उद्देशाने दि. 15 ऑगस्ट 2025 पासून "पोषणदूत योजना" या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा यशस्वी शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील वर्ग एक व वर्ग दोन अधिकारी 'पोषणदूत' बनून अतितिव्र कुपोषित बालकांना दत्तक घेऊन नॉर्मल श्रेणी त आणणे आणि बालकांचे पोषण व आरोग्य सुधारणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.