खुलताबाद: वेरुळ शिवारात अतिवृष्टीचा कहर; पिके व फळबागा पाण्याखाली, शेतकऱ्यांची भरपाईची मागणी
वेरुळ परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.कैलास पवार, रमेश पवार, सतीश फुलारे, अप्पाराव पवार, सुपडसिंग गुमलाडू यांसह शेतकऱ्यांचे उस, मका, केळी आदि पिके बाधित झाली आहेत.विशेषतः नुकतीच लावलेली केळीची शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिके लावली होती, मात्र अतिवृष्टीमुळे त्यांचे सर्व स्वप्न चुराडले.तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.