जालना: असीम सरोदेंच्या सनद निलंबनावर कायदेतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे; सौम्य कारवाई करायला हवी होती - ॲड. महेश धन्नावत
Jalna, Jalna | Nov 4, 2025 अॅड. असीम सरोदे यांच्या वकिली सनदेला महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने तीन महिन्यांची निलंबनाची शिक्षा दिल्याने कायदाविश्वात आणि वकिलांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. न्यायव्यवस्था आणि घटनात्मक पदांवर केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे बार कौन्सिलने ही कारवाई केली. मात्र ही कारवाई कितपत न्याय्य, यावर आता मतमतांतरे उमटू लागली आहेत. सामाजिक कार्यकर्ते अॅड. महेश एस. धन्नावत यांनी मंगळवार दि. 4 नोव्हे. 2025 रोजी सायं 6 वा. प्रतिक्रिया देताना बार कौन्सिलने अधिक सौम्य भूमिका घ्यायला हवी होती.