शहादा: येथील दिवाणी न्यायालय परिसरात न्यायमूर्ती व्ही. व्ही. निघवेकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न, शहादा पोलिसात गुन्हा दाखल
शहादा येथील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला.चोरट्यांनी न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानाचे कुलूप तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले होते. शहादा न्यायालय परिसरात क स्तर दिवाणी न्यायमूर्ती व्ही.व्ही. निघवेकर यांचे शासकीय निवासस्थान आहे. सोमवारी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास बंगल्याचे दिवे बंद करण्यासाठी शिपाई किशोर धोंडू बाविस्कर हे गेले होते. यावेळी त्यांना लोखंडी गेट आणि दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसून आले.