पुणे शहर: सारसबाग येथे रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांसोबत आबा बागुल यांनी साजरी केली दिवाळी
Pune City, Pune | Oct 20, 2025 फटाक्यांची आतषबाजी, फराळाची लगबग, कपड्यांची खरेदी अशा थाटात सधन कुटुंबांमध्ये दिवाळी साजरी होत असली तरी अनेक गरजू, गरीब मुलं मात्र हे सण साजरा करण्यापासून वंचितच राहतात. या मुलांसोबत माजी महापौर आबा बागूल यांनी दिवाळी साजरी केली. दरवर्षी आबा बागूल मित्र परिवाराकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.