जालना तालुक्यातील सेवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांची गंभीर हेळसांड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवार दि. 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शस्त्रक्रियेनंतर एकाच खोलीत तब्बल 22 महिला रुग्णांना दाखल करण्यात आल्याने खोलीत पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. या घटनेबाबत सुज्ञ नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार दाखल केली आहे.सेवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका शिबिरात हा प्रकार घडला.