जालना शहरातील महिलांनो जरा सावधान व्हा, संक्रातीच्या निमित्ताने अंगावर दागीने घालून एकमेकींच्या घरी जात असाल तर तुमच्यावर चोरट्यांचा डोळा आहे. अज्ञात चोरटे शहरात सक्रीय झाले असून ते दागीने हिसकावून पळून जात आहेत. शनिवार दि. 17 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कदीम जालना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. घायाळ नगर, जुना जालना परिसरात सायंकाळच्या वेळी महिलेकडील सोन्याचे गंठण हिसकावण्याची घटना घडली. दोन अज्ञात इसम दुचाकीवरून फरार झाले.