कोपरगाव: शहरातील गोदामगली परिसरातील आदिनाथ गृहनिर्माण सोसायटीतील फ्लॅटला आग
कोपरगाव शहरातील गोदाम गल्ली परिसरातील आदिनाथ गृहनिर्माण सोसायटी येथे आज बुधवार २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. पहिल्या मजल्यावर असलेल्या बिरुटे यांच्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली.सकाळच्या सुमारास अचानक घरातून धूर निघू लागल्याचे दिसताच नागरिकांनी आरडाओरडा करून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि घरातील अनेक संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.