"प्रशासकीय कामांसोबतच प्रत्यक्ष जमिनीवर उतरून लोकांच्या समस्या सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे," याच भावनेतून पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. विजया राजेश नंदुरकर ठाकरे यांनी प्रभाग क्रमांक ४, ताडेश्वर वार्ड येथे धावती भेट देत पाहणी दौरा केला. या विशेष दौऱ्यात त्यांच्या सोबतीला नगरसेविका वैष्णवीताई हटवार यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. विजया नंदुरकर यांनी वार्डातील रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांची बारकाईने पाहणी केली.