हिंगणघाट: सास्ती येथील शिक्षकांची अचानक बदली:विद्यार्थी पालक संतापले: उपविभागीय कार्यालयात विद्यार्थ्यांची थेट धडक
हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची अचानक शैक्षणिक सत्राच्या मध्येच शिक्षकाची बदली झाल्याने विद्यार्थी पालकांसह १ चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहचलेय. राज्य शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. शिक्षकांची मधूनच झालेली बदली ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी आहे. सास्ती येथील जिल्हा परिषद शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात निवड झालेली शाळा असून एज्यूकेशन टूरीझममध्ये देखील ही शाळा निवडल्या गेली आहे.