उमरी: बोळसा येथे सततच्या नापीकीला व बॅंकेच्या कर्जाला कंटाळून 26 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या;उमरी पोलिसात नोंद
Umri, Nanded | Nov 19, 2025 नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बोळसा बु.येथे दि १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा ते दि ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी सातच्या दरम्यान यातील मयत नामे सोपान मारोती डिडेवार वय २६ वर्ष यांनी शेतीच्या सततच्या नापीकीला व बँकेच्या कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी खबर देणार श्रीनिवास डिडेवार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस स्टेशन उमरी येथे आज सायंकाळी आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी हे आज करीत आहेत.