पुणे शहर: आयुष कोमकर हत्या प्रकरण! आंदेकर टोळीचा कृष्णा आंदेकर समर्थ पोलिस ठाण्यात हजर
Pune City, Pune | Sep 16, 2025 पुण्यातील नाना पेठ परिसरात 5 सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि आंदेकर टोळीचा मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. त्याने समर्थ पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केले असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून मिळाली.