रावेर: अपघाताचा खोटा गुन्हा दाखल केला म्हणून भालशिव येथील फिर्यादीत ठरला आरोपी, यावल पोलिसांकडून दोषारोप पत्र दाखल
Raver, Jalgaon | Nov 20, 2025 भालशिव येथील रहिवाशी कृष्णा कोळी वय २३ या तरुणाने यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता की त्याला दुचाकी क्रमांक एम.एच.१९ डि.एम.९४७९ द्वारे जात असताना दुचाकी क्रमांक एम. एच.१९ इ.एन.३१४२ वरील चालकाने मागून धडक दिली. मात्र या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांच्या निदर्शनास आले की सदर तरुणाने विमा पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला होता. तेव्हा या गुन्ह्यातील फिर्यादीलाच पोलिसांनी आरोपी घोषित करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.