जाफराबाद: वडशेद येथील रहिवासी असलेल्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाचा पुणे सैनिकीय रुग्णालयात दुःखद मृत्यू
आज दि.15 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी रात्री 10वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील वडशेद येथील रहिवासी असलेल्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाच दुःखद निधन झालं आहे, सदर जवान हा युनिट 24 मराठा लाईट इन लदाख येथे कार्यरत होता व तो आजारी होता त्याच्यावर पुणे येथे मागील काही दिवसापासून सैनिक कमांड रुग्णालय येथे उपचार सुरू होते मात्र 14 सप्टेंबर रोजी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला,त्याचे नाव संदीप पाटील ढाले आहे.16सप्टेंबरला सकाळी भोकरदन येथे अंत्यसंस्कार होणार आहे