आज दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 10च्या सुमारास कल्याण येथील चक्की नाका परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. वाहतूक कोंडी झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. तसेच या ठिकाणी कोणतेही ट्रॅफिक पोलीस किंवा ट्राफिक वॉर्डन उपस्थित नसल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असल्याच बोलल जात आहे. अखेर स्थानिकांनीच या वाहतूक कोंडीला मार्ग दाखवला.