राहुरी: कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट थांबावी, शेतकरी सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत कापूस व्यापाऱ्यांकडून वजनात काटा मारला जात असून घट धरली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. म्हणून आम्ही भावाप्रमाणे कापूस खरेदी करावा अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने करण्यात आली अहुन आज शनिवारी दुपारी तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.