गोरेगाव: ग्राम सोनी येथे कार्तिक पौर्णिमा निमित्त आरोग्य भारती द्वारा आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील ग्राम सोनी येथे कार्तिक पौर्णिमा निमित्त आरोग्य भारती द्वारा योग प्रशिक्षण कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले होते. या योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते योगेश चौधरी, योगशिक्षक पुरुषोत्तम साकुरे, डॉक्टर हितेश पारधी यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते. या योग प्रशिक्षण कार्यक्रमाचा मोठ्या संख्येत परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.