आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीमध्येच निवडणूक लढणार असून,राज्यभरातील महानगरपालिका निवडणुका काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीतून लढवल्या जाणार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले आहे,तर काँग्रेस आणि वंचितची चर्चा सुरू आल्याचं ही ते म्हणाले.काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली