मौदा: एनटिपीसी मौदा येथे उपाय संस्थेच्या वतीने वार्षिक महोत्सव साजरा
Mauda, Nagpur | Oct 9, 2025 सामाजिक संस्था उपाय च्या वतीने एनटिपीसी मौदा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षीक महोत्सव साजरा करण्यात आला. याबाबत चे वृत्त असे की दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सामाजिक संस्था उपाय च्या वतीने वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून एनटिपीसी मौदा चे प्रमुख हिम्मत सिह चव्हाण, उपाय संस्थाचे संचालक वरून श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.