१०वी-१२वीच्या परीक्षेत आता प्रश्नपत्रिका नव्हे कृतिपत्रिका दिल्या जातात. त्यात प्रत्येक विषयाच्या प्रात्यक्षिकासाठी २० गुण, वस्तुनिष्ठ प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे व निबंध असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांचा ताण घेऊ नये. अभ्यासाचे वेळापत्रक करावे, पूर्वीच्या परीक्षांमधील प्रश्नपत्रिकांचा सराव करावा, चांगले गुण मिळतील.