देवळी: कायदेशीर घरांचा मार्ग मोकळा! पुलगावात नागरिकांच्या हक्काच्या पट्टे वाटपाच्या कामाला 'सेवा पंधरवड्यात' गती:आ.राजेश बकाने
Deoli, Wardha | Sep 26, 2025 पुलगाव शहरातील हिंगणघाट फैल आणि इंदिरानगर या प्रभागांतील नागरिकांसाठी एक मोठा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पट्टे वाटपाचा महत्त्वाच्या प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने निघाला आहे. पुलगाव नगरपरिषदेने 'सेवा पंधरवडा' या उपक्रमांतर्गत हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांच्या हक्काच्या या मागणीला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. असे आज 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे