माजी मंत्री बच्चू कडू यांचा व्हिडिओ हाती आलेला आहे. 9 जानेवारीला रात्रीच्या सुमारास प्रहार जनशक्ती पक्षातर्फे नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भव्य प्रचार सभा संपन्न झाली. या सभेमध्ये माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी थेट यावेळी आमदार खोपडे यांच्यावर निशाणा साधला आहे. यादरम्यान हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार खोपडे यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर केलेल्या तक्रारीचाही त्यांनी येथे उल्लेख केला.