भंडारा: भंडाऱ्यात मतमोजणी केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा ; व्हीएममधून नाव गायब झाल्याचा दावा ; व्हिडीओ <nis:link nis:type=tag nis:id=viral nis:value=viral nis:enabled=true nis:link/>
कुंदा राऊत यांनी ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. "आम्ही लेखी तक्रार घेऊन गेलो असता अधिकारी आमची तक्रार स्वीकारायला तयार नव्हते. शेवटी आम्हाला त्यांच्या टेबलावर तक्रार फेकून द्यावी लागली," असा संताप राऊत यांनी व्यक्त केला. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही, असा पवित्रा उमेदवाराने घेतला आहे.