निवडणूक कामकाजासाठी यंत्रणांनी सज्ज व्हावे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश नोडल अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष तयारीचा आढावा निवडणूक ही व्यापक आणि संवेदनशील प्रशासकीय प्रक्रिया असून प्रत्येक टप्प्यात काटेकोर नियोजन, अंमलबजावणी आणि विभागांमधील अचूक समन्वय अनिवार्य आहे. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेच्या चौकटीत काम पूर्ण करून निवडणूक व्यवस्थापनात कोणतीही पोकळी राहू नये,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.