मोहाडी: कोका येथे रेल्वेने कटून अनोळखी इसमाचा मृत्यू, घटनेचा मर्ग मोहाडी पोलिसात दाखल
कोका येथे रेल्वेने कटून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दि. 27 नोव्हेंबर गुरुवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.यातील फिर्यादी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे उप स्टेशन प्रबंधक टीकमचंद शाह यांच्या तक्रारीवरून तसेच पोलीस पंचनामा व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून घटनेचा मर्ग दि. 28 नोव्हेंबर रोज शुक्रवारला मोहाडी पोलिसात दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.