कोपरगाव: पंचायत समिती येथे आमदार काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार संपन्न
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या पंचायत समिती तसेच पशुसंवर्धन विभाग व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) आदी विभागांतील समस्या सोडवण्यासाठी आ.आशुतोष काळेंच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वा.पंचायत समिती कोपरगाव येथे 'जनता दरबार' पार पडला. यावेळी आ. काळे यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेत ह्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.