महाड: पुन्हा आलेल्या परतीच्या पावसाचा रायगडमध्ये शेतकऱ्यांना फटका..@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 22, 2025 परतीच्या पावसाचा रायगडमधील शेतकऱ्यांना फटका बसण्याची भिती निर्माण झाली आहे. एका महिन्यात तीन वेळा परतीचा पाऊस कोसळला यामुळे कापणीसाठी तयार भाताचे पिक भिजून नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे. भाताचे पिक कापणीसाठी तयार झाले आहे, पाऊस देखील थांबला होता. यामुळे शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली मात्र 8 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर आणि काल 22 ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला.