करवीर: दसरा महोत्सव सर्वसमावेशक जनोत्सव बनवूया - खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
कोल्हापूर मधील दसरा महोत्सवाचा राज्य शासनाने नुकताच राज्याच्या प्रमुख महोत्सवात समावेश केला आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असून दसरा महोत्सव अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक जनोत्सव बनवण्याच्या दृष्टीने विचार करूया असे प्रतिपादन आज खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले आहे. त्यांच्या हस्ते दसरा चौक येथे शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झालं. त्यावेळी ते बोलत होते.