न्यू वैशाली टायर गोरेगाव रोड परिसरात दारूच्या नशेत मोटरसायकल चालविताना पकडलेल्या 64 वर्षीय चालकावर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी कलम 185 मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे. दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता न्यू वैशाली टायर गोरेगाव रोड गोंदिया येथे आरोपी हा मोटरसायकल वेडीवाकडी व संशायास्पद पद्धतीने चालवीत होता. त्याला पोलीस हवालदार राजू राठोड यांनी पकडले. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.