आमदार नसताना मला 20 कोटीचा निधी सदा सरवणकर
आज दिनांक 21सप्टेंबर 2025वेळ सकाळी 11 वाजता च्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात माजी आमदार सदा सरवणकर यांनी मी आमदार नसताना मला 20 कोटी रुपये मिळाले असा दावा केला आहे. सरवणकरयांच्या या व्हिडिओमुळे सत्ताधारी आमदारांमध्ये उलटसुलट चर्चाला उधाण आल्या असून सत्ताधारी आमदार यांनी अनेकदा निधी विकास कामाला मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या.