यवतमाळ: राष्ट्रमत राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असावे, मोरारी बापू : नऊ दिवसीय रामकथा पर्वाचा समारोप
आपण खरोखर रामराज्याची संकल्पना साकार करू, इच्छित असू तर साधूमत, लोकमत, वेदमत आणि राष्ट्रमत यांना प्राधान्य द्यावे लागेल. साधूमताच्या आलोकात घेतलेले लोकमत नेहमी प्रभावी ठरते. राष्ट्रमत हे राजकारणप्रेरित नसून राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असावे, असे प्रख्यात संत व नामांकित कथावाचक मोरारी बापू यांनी रविवारी रामकथा पर्वच्या समारोपप्रसंगी सांगितले.