शिवसेनेत असताना नारायण राणे यांचे काय हाल केलेत ते सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे नारायण राणे यांची काळजी शिवसेनेने करू नये त्यांची काळजी करायला भारतीय जनता पक्ष समर्थ आहे असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दीपक केसरकर यांना लगावलाय. राणे यांना बाजूला करण्याचा विषयच नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय.