शिरपूर: तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत युक्तधारा प्रणालीवर तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न
Shirpur, Dhule | Nov 3, 2025 तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ई-सक्षम पोर्टलमधील युक्तधारा प्रणालीचा अवलंब करण्यासाठी बोराडी वनक्षेत्रापाल किरण गिरवले यांच्या अध्यक्षतेखाली 3 नोव्हेंबर तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.सदर कार्यशाळा तहसीलदार महेंद्र माळी,पंचायत समितीचे बीडीओ प्रदीप पवार,तालुका कृषी अधिकारी संजय पवार,व वनविभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पंचायत समितीच्या तालुका मग्रारोहयो शाखेच्या वतीने करण्यात आले होते.