समुद्रपूर: मोहगांव वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तांडव: अनेक घरांचे छप्पर उडून नुकसान
समुद्रपुर:तालुक्यातील मोहगांव येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अनेक घराचे छप्पर उडाले तर अनेक झाडे जमिनीवर कोसळले यामध्ये कोणत्याही जिवीत हाणी झाली नसली तरी छप्पर उडालेल्या घरातील साहित्य पावसाने भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुसकानाचा पंचनामा करुन आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.