विक्रमगड: जिल्ह्यात गावोगावी राबविण्यात येणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; 17 सप्टेंबर रोजी शुभारंभ
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणार असून या अभियानाच्या शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवून गावोगावी विकासाची गंगा पोहोचवणे आणि लोकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करणे या हेतूने हे अभियान राबविण्यात येणार आहे. खासदार, स्थानिक, आमदार, लोकप्रतिनिधी विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.