चंद्रपूर: बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्लीच्या अल्पमुदत प्रशिक्षणांना नागपूर विद्यापीठाची मान्यता
बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली (BRTC) या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या “बांबू हस्तकला” आणि “बांबू फर्निचर” या अल्पमुदत व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.