जळगाव: भूषण कॉलनीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेचा सोन्याची गोप लांबवला; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुषण कॉलनी परिसरात शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५:३० वाजता एका ६९ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचा सोन्याची गोप दुचाकीस्वार चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे